Blogging
Published in Blogging
avatar
31 minutes read

आयुष्य जगण्याची सोप्पी पद्धत

आयुष्य म्हणजे नेमक काय? हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो

आयुष्य जगण्याची सोप्पी पद्धत

आयुष्य म्हणजे नेमक काय? हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो,  हो ना? पण मला हेच समजतं नाही जे आपण सर्वजण जगतोय तेच तर आहे ना आयुष्य, आता आयुष्य म्हणजे नेमक काय याचा खोल विचार केला की माझ्या कविमनासमोर दिसते ती म्हणजे एक रेल्वे ज्यात माणसांची खूप गर्दी आहे, तीच रेल्वे आपल्याला प्रत्येक स्थानकावर थांबवून अनुभवांची पेटी देऊन जाते, पण त्या पेटीच्या वस्तूंतील रहस्य टप्प्याटप्प्यानेच उलगडत जातात.  आणि ते उलगडले की माणसाला शिकवणीची किल्ली देऊन जातात .

जन्माला आल, की बाळाचं सुरु होत आयुष्य, अनुभवाचे धडे मिळत गेले की खऱ्या अर्थाने होतो तो मनुष्य.

आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या गरजा तर मूलभूत आहेत. पण खरी गरज असते माणसाला ती म्हणजे प्रेमाची, मग ते प्रेम आईच असो, वडिलांच असो, कुटुंबाची असो वा साथीदारच असो, पण ते प्रेम अगदी समुद्रातल्या लाटांसारखं निखळ वाहणारे असावे, सतत वाहणार भरती, ओहोटी आली तरी समुद्रात अलगद सामावून घेणार,. आयुष्य हे असच असत कधी रडावं लागत, कधी हसावं लागत, कधी समजावून सांगण्यापेक्षा समजून घ्यावं ही लागत, मग हे आयुष्य अगदी सोप्प वाटायला लागत. एक एक पायरी आयुष्याची चढायची असते. कोणतेही काम करताना हळू -हळू एक एक टप्पा गाठायचा असतो. असं वाटतं असत त्या काळात मनाला की, अरे! किती अवघड आयुष्य आहे लवकर पुढे जाऊच देत नाही, अजून किती बर कष्ट करायचे मी ? तर त्याच अगदी सोप्प आणि तुम्हाला पटणार उत्तर आहे बरका माझ्याकडे हेबघा तुम्ही जेव्हा पायऱ्या चढता तेव्हा अचानक शेवटची पायरी चढता का? नाही ना पडू नये या भीतीने हळू हळू जातात ना? मग आयुष्याच्या पायऱ्या अश्याच आहेत वेळ लागतो मात्र यशाच उंच शिखर बघायला मिळत, किती विचित्र गणित असत न आयुष्याच! जेव्हा जन्माला येतो तेव्हा श्वास घेऊन येतो नाव मात्र नसत, जेव्हा या जन्माला मिठी मारून त्यात अलगद सामावून जातो तेव्हा नाव मात्र खूप मोठं असत, पण जन्माला येताना जो श्वास घेऊन येगो तोच मात्र नसतो! 

समस्या म्हंटल की आयुष्य नकोसे होते, आणि आनंद म्हंटल की आयुष्य हवेसे वाटते पण तुम्हाला हेच समजतं नाही की समस्या सोडवल्यांनंतरच आनंद भेटेल ना, आणि समस्या सोडवण ही आनंदाकडे जाण्याची पायरी आहे पण हो ती पायरी चढायचा प्रयत्न फक्त पायाने नाही तर सय्यम आणि मनाच्या तयारीने करावा लागतो. आपण ना, आयुष्याला उगाच कठीण समजून बसलोय थोड्यावेळ आपल्या प्रेमळ व्यक्तीशी बोलल्यावर वाटतं ना आयुष्य सोप्प? मग जे आवडत ते करूया ना आणि आपल आयुष्य सोप्प बनवूया ना उंच शिखर बघण्यासाठी आधी दगडाना बघावच लागत ना?  मग तेच दगड तुमच्या समस्या समजून दूर केलेत की बघा कालांतराने तुम्ही उंच शिखर गाठलेला असाल, आयुष्य एकच नाही प्रत्येक वेळी नवीन असत पण आपण आनंदाने जगायला संधी देत नाही, मरण मात्र एकदाच असत. आता हे मला हीं नाही माहिती चंद्र - तारे इतके मग आयुष्य एकदाच का? म्हणजे आपण आयुष्य एकच आहे असं काय समजतो? जाऊद्या याच उत्तर शोधण्यापेक्षा आयुष्याने दिलेल्या प्रत्येक संधीच सोन करू आणि जे एकदा भेटल्यावर त्याचा आनंद घेऊ, आयुष्य सोप्प्या मार्गाने जगून बघू.

  " आता या आयुष्यात बसू नका रडत, मी दिलीये तुम्हाला आयुष्य जगण्याची सोप्पी पद्धत "
कुमारी. रेणुका विनोद गोल्हार

0 Comment